राजमुद्रेचा गैरवापर करणाऱ्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:13 PM2018-04-03T22:13:29+5:302018-04-03T22:13:29+5:30
आपल्या घराच्या नेमप्लेटवर राजमुद्रा अंकित करून महाराष्ट्र शासन असे लिहिणाºया येथील माजी सैनिक तथा विशेष कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध यवतमाळच्या लोहारा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपल्या घराच्या नेमप्लेटवर राजमुद्रा अंकित करून महाराष्ट्र शासन असे लिहिणाऱ्या येथील माजी सैनिक तथा विशेष कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध यवतमाळच्या लोहारा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीची लोहारा पोलिसांनी चौकशी सुरू केली असून त्या कार्यकारी अधिकाºयावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
विनोद लक्ष्मण आरेवार रा. रेणुकानगरी वाघापूर (यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. ते माजी सैनिक असल्याचे त्यांच्या घराच्या नेमप्लेटवरच लिहिलेले आहेत. भारतीय राजमुद्रेचा वापर करून त्यांनी आपल्या घराच्या दर्शनी भागावर नेमप्लेट लावली आहे. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील रवींद्र बाबाराव मानकर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी आरेवार यांच्याकडून राजमुद्रेचा गैरवापर होत असल्याचे नमूद केले. तक्रारीसोबत घराच्या नेमप्लेटचे छायाचित्रही जोडले आहे. यावरून लोहाराच्या ठाणेदार शीतल मालटे यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यावरून एक पोलीस पथक रेणुकानगरीत मंगळवारी दुपारी धडकले. त्यांनी याची रितसर चौकशी करून आरेवार यांच्या विरोधात भारतीय राजमुद्रा वापर व प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे सांगितले.