‘मेडिकल’अभ्यागतांच्या वर्तणुकीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 09:54 PM2017-10-09T21:54:40+5:302017-10-09T21:55:05+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून मिळणाºया वागणुकीविरोधात डॉक्टर आणि कर्मचाºयांनी एल्गार पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून मिळणाºया वागणुकीविरोधात डॉक्टर आणि कर्मचाºयांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांना निवदेन देऊन आपला रोष व्यक्त केला. अभ्यागत मंडळातील सदस्यांनी त्यांच्या सूचना थेट अध्यक्षांकडेच मांडाव्या अशीही मागणी केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार अभ्यागत मंडळातील सदस्यांना केवळ शिफारशी करण्याचा अधिकार आहे. याच मर्यादेत राहून त्यांनी रुग्णालय व महाविद्यालयाशी संबंधित मुद्यावर बैठकीमध्ये अध्यक्षांशी चर्चा करावी. या बैठकीला डॉक्टर्स व कर्मचाºयांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी उपस्थित राहील, असेही स्पष्ट केले आहे. विभागाच्या तक्रारी व सूचना मंडळाच्या सदस्यांनी अध्यक्षांकडे मांडाव्या त्यांनतर अध्यक्षांनी अधिष्ठाता यांना निर्देश द्यावेत. अधिष्ठांताच्या आदेशावरूनच आम्ही त्याची अंमलबजावणी करू, असे डॉक्टरांच्या संघटनेने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, सचिव डॉ. गजानन मस्के यांनी निवेदन दिले आहे. अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून जाणीपूर्वक असभ्य शब्दांचा वापर करून अधिकारी कर्मचाºयांचा अपमान केला जातो. हा प्रकार निंदनीय आहे. त्यांच्याकडून कर्मचाºयांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. रुग्णसेवेसाठी सर्वांनीच समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी कुणा एकाला टार्गेट करू नये, अशा मागणीचे निवेदन तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश राठोड, सचिव अविनाश जानकर यांनी अधिष्ठातांना दिले. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाला पाठविल्या आहे.