पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 09:42 PM2019-05-31T21:42:21+5:302019-05-31T21:43:14+5:30

भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.

Complete the water supply plan | पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण करा

पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण करा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे उपस्थित होते.
नागरिकांना पाणी मिळावे म्हणून गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी दोन वर्षात जवळपास १३ कोटी रुपये देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी स्त्रोतासाठी प्रस्तावित करा. विहीर अधिग्रहण आणि टँकरबाबतच्या प्रस्तावांचे अधिकार आता उपविभागीय स्तरावर देण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या अशा पुनर्वसित गावांमध्ये टँकरची गरज पडू देऊ नका. मग्रारोहयोअंतर्गत जलसंधारणाची कामे हाती घ्या तसेच जलयुक्तची कामे जुनअखेरपर्यंत संपविण्याचे नियोजन करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
यावेळी ना.येरावार यांनी पाणी टंचाई, उपलब्ध पाणीसाठा, चारा टंचाई, दुष्काळाबाबत केलेल्या उपाययोजना, दुष्काळनिधी वाटप, बोंडअळी निधी वाटप, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, नरेगाअंतर्गत सुरू असलेली कामे आदींचा आढावा घेतला.
नगर पालिका हद्दीत रेन वॉटर हार्वेस्टिंग
नगर पालिका हद्दित पावसाचे पाणी अडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाविन्यपूर्ण योजनेतून आता रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शासकीय तसेच खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. यवतमाळ पालिकेअंतर्गत सद्यस्थितीत वॉर्डावॉर्डात जावून नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Complete the water supply plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.