चांगल्या कामाचे कौतुक, कामचुकारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:04 PM2017-12-03T22:04:16+5:302017-12-03T22:05:01+5:30

सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाचे प्रमुुख अंग असून या विभागात चांगले काम कराल तर शाबासकी मिळेल. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाईला तयार राहा, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंत्यांना दिला.

Compliments for good work, action on workers | चांगल्या कामाचे कौतुक, कामचुकारांवर कारवाई

चांगल्या कामाचे कौतुक, कामचुकारांवर कारवाई

Next
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : खड्डे बुजविण्यासाठी डिसेंबरचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम विभाग शासनाचे प्रमुुख अंग असून या विभागात चांगले काम कराल तर शाबासकी मिळेल. मात्र कामात कुचराई केल्यास कारवाईला तयार राहा, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभियंत्यांना दिला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात रविवारी सकाळी आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. त्यांनी रस्त्यांच्या डागडुजीसाठी बांधकाम विभाग यंत्रणेला डिसेंबर पर्यंतचा अल्टीमेटमही दिला. राज्यात आत्तापर्यंत कामात कुचराई करणाºया २०० अधिकारी, कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केल्याचे त्यांनी उपस्थित अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच चांगले काम केल्याबद्दल दोन हजार अधिकारी, कर्मचाºयांना बढती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘आता तुम्हाला काय हवं, हे तुम्हीच ठरवा’, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
आढावा बैठकीत त्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना काम करताना येणाºया अडचणींबाबत उघडपणे मत मांडण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. यामुळे रस्ते वारंवार खराब होतात. अ‍ॅप डाऊनलोड करून खड्ड्यांचा फोटो तक्रारकर्त्याला थेट मंत्रालयात पाठविता येतो. त्यासाठी मंत्रालयातील सर्व अधिकाºयांवर प्रत्येकी तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे अधिकारी आपल्या जिल्ह्याचे पालक आहेत. या माध्यमातून पुढील दोन वर्षात महाराष्ट्रातील चित्र बदलण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
राज्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. अंदाजपत्रकात जास्त कामे कशी समाविष्ट करता येईल, याबाबत नियोजन करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन हजार किलोमीटरसाठी ८०० कोटी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी एक हजार किलोमीटरचे कंत्राट निघाले असून १५ दिवसात उर्वरित कामाला मंजुरी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे, रस्त्यांचे काम हे स्वत:चे घर बांधत आहे, अशी भावना ठेवून करावे, असे आवाहन त्यांनी केले. नवीन योजना राबविताना कनिष्ठ कर्मचाºयांना विश्वासात घ्या, एखादी चूक झाल्यास ती त्याने आपल्याला सांगितली पाहिजे, अशी प्रतिमा तयार करा, असे आवाहनही चंद्रकात पाटील यांनी केले.
दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता राजू चव्हाण आणि त्यांच्या सहकाºयांचा यावेळी पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य प्रादेशिक अभियंता चंद्रशेखर तुंगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, संभाजी धोत्रे, रवींद्र मालवत यांच्यासह सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता उपस्थित होते.
ग्रामीण रस्त्यांसाठी स्वतंत्र युनिट
प्रधामंत्री सडक योजना आणि मुुख्यमंत्री सडक योजना जशा वेगळ््या आहे, त्याच धर्तीवर आता ग्रामीण रस्त्यांची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे न ठेवता त्यासाठी स्वतंत्र युनिट तयार केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या वक्तशीरपणामुळे अभियंत्यांची धावपळ
मुुबंई वरून आल्यानंतरही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सकाळी ८.१० वाजता बैठक सुरू केली. मात्र तोपर्यंत अनेक अभियंते बैठकीला पोहोचले नव्हते. त्यांनी उशिरा बैठकीला हजेरी लावली. तब्बल पावणे दोन तास ही बैठक चालली. यात प्रत्येक बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

Web Title: Compliments for good work, action on workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.