तळणी येथे धम्म परिषदेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 09:55 PM2018-04-01T21:55:06+5:302018-04-01T21:55:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.
समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, प्रमोद राठोड, दादाराव बोटरे, दयाशंकर भाकरे, महेंद्र भरणे, गौतम वाकोडे मंचावर उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जंयती वर्ष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कुºहा (तळणी) येथील त्रिरत्न बुद्ध विहार, डॉ.बी.आर. फाउंडेशनतर्फे ही दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. धम्म ध्वजरोहणानंतर परिषदेला सुरूवात झाली. भंते संघरत्न मानके, भंते खेमोधम्मो महास्थवीर, भंते सुबोध आणि भंते अश्वजित यांनी मार्गदर्शन केले.
उदघाटनाला माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, अनिल आडे, डॉ.महेंद्र रामटेके, पी.यू. लोखंडे, बी.के. गायकवाड, अविनाश बन्सोड, अनिल कांबळे आदी उपस्थित होते. सतीश रामटेके यांनी ‘अहिंसक अंगुलीमाल’चे सादरीकरण केले. सर्वर जानी, रेखा भारती, आकाश राजा आदींनी बुद्ध-भीम गीतांवर आधारित प्रबोधनपर कव्वाली सादर केली. व्दितीय सत्रातील परिसंवादात सुदर्शन इंगळे, प्रा.विलास भवरे, रमेश बुरबुरे आदींनी सहभाग घेतला. नंतर उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. अनिल इंगोले, सतीश पाटील, प्रभाकर भगत, उत्तमराव रहाटे, सागर भरणे, नमुबाई खरतडे यांचा सत्कार करण्यात आला. क्रांती मिलन, राजेंद्र मगर, कैलास दादा व संच हातगांव यानी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.
संचालन सहदेव चहांदे, आभार एन.एस. कोम्पलवार यांनी मानले. चिंतामण चहांदे, भास्कर भरणे, राजू चहांदे, लिलाधर भरणे, अनुप डांगे, नरेंद्र चहांदे, आकाश चहांदे, सुधीर भरणे, संदीप वाकोडे, निखील लढे, आशिष मेश्राम, रोनित भरणे, अरुण मेश्राम, दुर्वास वाघमारे, नीलेश चहांदे, गोलू वानखडे, गुलशन डांगे, निशांत चहांदे, कुंडलिक देवतळे, सम्यक भरणे, कैलास धोंगडे, अभय खरतडे, वैभव खरतडे आदींनी परिश्रम घेतले.