डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरोघरी स्वच्छता मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:00 AM2021-09-25T05:00:00+5:302021-09-25T05:00:36+5:30

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पूर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले.

Conduct a house-to-house cleaning campaign to prevent dengue | डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरोघरी स्वच्छता मोहीम राबवा

डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरोघरी स्वच्छता मोहीम राबवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ  :  जिल्ह्यात डेंग्यूचा आजार वाढू नये यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषद यांनी सर्व नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांनी कोरडा दिवस पाळून घराच्या परिसरातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावून पाणी साचणार नाही यासाठी उपायोजना करून डेंग्यू व मलेरियाच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी आमोल येडगे यांनी केले.
शुक्रवारी विशेष स्वच्छता अभियानाची सुरूवात यवतमाळ शहरातील जय-विजय चौक व संभाजीनगर परिसरातून करण्यात आली. याठिकाणी साफसफाई मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेवून जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नगराध्यक्ष कांचन चौधरी, मुख्याधिकारी माधुरी मडावी तसेच आरोग्य सभापती साधना काळे, नगरसेवक सुजित राय, संगीता राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय आकोलकर आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पूर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले. ही साफसफाई केवळ एक दिवसासाठी न करता किमान सात दिवस  करावी, असेही त्यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे स्वच्छता मोहिमेला भेटी देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  नगर परिषदेतील डॉ. विजय अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी क्रांतीकुमार मावडीकर, डॉ. तनवीर शेख, प्रशांत पाटील, टी. व्ही. कुळकर्णी, धीरज पिसे, रवी रामेकर, सुनील वंजारी, मुन्ना शुक्ला, मोहन दहेकर, संतोष गजभिये आदी यावेळी मोहिमेदरम्यान उपस्थित होते. 

मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे आवाहन 
- यवतमाळ शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी प्रत्येक दुकानदार, तेथे काम करणारे कर्मचारी व अन्य प्रत्येक नागरिकाला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच डेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना सूचविल्या आहे. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यातून होते. त्यामुळे घरातील अडगळीत ठेवलेले सामान, फ्रीजचा टफ, परिसरातील नाल्या स्वच्छ ठेवण्याची सूचना मडावी यांनी केली आहे. घरातील खिडक्यांना, फीश टॅंकला जाळ्या बसवाव्या, घराचा परिसर श्रमदानातून स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. 
 

 

Web Title: Conduct a house-to-house cleaning campaign to prevent dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.