विदर्भ राज्यद्रोह्यांचे डिपॉझिट जप्त करा
By admin | Published: February 10, 2017 01:55 AM2017-02-10T01:55:47+5:302017-02-10T01:55:47+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही काँग्रेस पक्ष स्थापने पूर्वीची आहे. विदर्भ राज्याला काँग्रेस,
पत्रपरिषद : जांबुवंतराव धोटे यांचे आवाहन
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही काँग्रेस पक्ष स्थापने पूर्वीची आहे. विदर्भ राज्याला काँग्रेस, शिवसेना, मनसे यांसारख्या राजकीय पक्षाकडून सातत्याने विरोध होत आहे. या पक्षांच्या उमेदवारांचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत विदर्भातील जनतेने डिपॉझीट जप्त करावे, असे आवाहन विदर्भवादी नेते माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी पत्रपरिषदेतून केले.
विदर्भ राज्य व्हावे असा ठराव १८८८ मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली. आज तिच काँग्रेस वेगळ््या विदर्भ राज्याला विरोध करत आहे. त्यांच्या पाठोपाठ शिवसेना, मनसेकडूनही विरोध होत आहे. भाजपाकडून लवकर विदर्भ राज्याची घोषणा केली जाईल, देशात व राज्यातील भाजपा सरकर योग्य निर्णय घेत आहे. प्रधानमंत्री मोंदीनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय योग्य असून त्याचे चांगले परिणाम दिसतील असेही धोटे म्हणाले. डोबिंवली येथे झालेल्या साहित्य संमेलनात मावळते अध्यक्ष सबनिस यांनी विदर्भ राज्याला विरोध केला. तेव्हा साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष काळे हे बसून ऐकत होते. विदर्भातील असूनही काळेंनी सबनिस यांना विरोध केला नसल्याचे ते म्हणाले. (कार्यालय प्रतिनिधी)