उमरखेडच्या बँक अधिकाऱ्यांना दिली तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:13+5:30

खरीप हंगाम तोंडावर आला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकरी भरडले जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अडचण आणू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी आमदारांनी दिली. कर्ज वाटपासंदर्भात त्यांनी खास बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार रूपेश खांडारे, तालुका निबंधक पुरुषोत्तम नाईक आदी उपस्थित होते.

Congratulations to the bank officials of Umarkhed | उमरखेडच्या बँक अधिकाऱ्यांना दिली तंबी

उमरखेडच्या बँक अधिकाऱ्यांना दिली तंबी

Next
ठळक मुद्देआढावा : शेतकऱ्यांची पीककर्जासाठी अडवणूक करू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी आमदारांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बँक अधिकाºयांना कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, अशी तंबी दिली.
खरीप हंगाम तोंडावर आला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकरी भरडले जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अडचण आणू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी आमदारांनी दिली. कर्ज वाटपासंदर्भात त्यांनी खास बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार रूपेश खांडारे, तालुका निबंधक पुरुषोत्तम नाईक आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे शेतकरी घरात बसून आहे. अनेकांनी नियमित कर्जाची परतफेड करून नव्या कर्जासाठी बँकेत चकरा मारणे सुरू केले. याबाबत बँकेने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट किती टक्के पूर्ण केले, किती शेतकऱ्यांना कर्ज दिले याचा आढावाही घेतला. शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज देण्याचे निर्देश दिले. तसेच मुद्रांकाकरिता शेतकºयांना सवलत देण्याची सूचना केली.

कर्जमाफी कागदावरच
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत तालुक्याला आतापर्यंत कोणताही निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गतसुद्धा अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात माफीची रक्कम जमा झाली नाही. हे सर्व शेतकरी वेटींगवर असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आमदारांनी बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जासाठी अडवू नका, अशी तंबी दिली.

Web Title: Congratulations to the bank officials of Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.