इंधन दरवाढीच्या विरोधात पुसदमध्ये काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:31+5:302021-06-09T04:51:31+5:30
पुसद : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढ विरोधात सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत ...
पुसद : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढ विरोधात सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्जा यांच्या सूचनेवरून येथील भारत पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर जिल्हा महासचिव सय्यद इश्तियाक यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या करामधून लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे. देशातील जनता महागाईने होरपळून निघत आहे, असा आराेप यावेळी करण्यात आला.
आंदोलनात पुसद शहर व तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. निवेदन देताना जिल्हा महासचिव सय्यद इश्तियाक, तालुकाध्यक्ष शरद़ ढेबरे, अल्पसंख्यक विभाग जिल्हा उपाध्यक्ष अमजद खान, जिल्हा महासचिव अशोक उंटवाल, नन्हेखान, सै. आसिमोदीन, शे. ऱजाक सोहेल चौहान, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.