काँग्रेस नगरसेवक पुत्राचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:40 PM2018-02-14T23:40:32+5:302018-02-14T23:41:20+5:30

शहरात खुनाची मालिका सुरू असून मंगळवारी रात्री चोरीची जनावरे ठेवण्याच्या वादातून काँग्रेस नगरसेवक पुत्राचा खून करण्यात आला. ही घटना पोबारू ले-आऊटमधील चौफुलीवर घडली. सलग ही खुनाची तिसरी घटना आहे.

Congress corporator boy son's murderous blood | काँग्रेस नगरसेवक पुत्राचा निर्घृण खून

काँग्रेस नगरसेवक पुत्राचा निर्घृण खून

Next
ठळक मुद्देचाकूचे वार : पोबारु ले-आऊटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात खुनाची मालिका सुरू असून मंगळवारी रात्री चोरीची जनावरे ठेवण्याच्या वादातून काँग्रेस नगरसेवक पुत्राचा खून करण्यात आला. ही घटना पोबारू ले-आऊटमधील चौफुलीवर घडली. सलग ही खुनाची तिसरी घटना आहे.
अकील शहा सलीम शहा (२२) असे मृताचे नाव आहे. चोरीची जनावरे ठेवण्यावरूनच अकीलचा वाद झाला. समझोत्यासाठी त्याला पोबारू ले-आऊट परिसरातील एका गोदामाकडे बोलविण्यात आले. येथे दबा धरून असलेल्या शेख इम्रान ऊर्फ गोलू शेख मेहमूद (२०) रा.अशोकनगर, शेख सलमान शेख अहमद कुरेशी (२२) रा.कुरेशीपुरा व हुसेन कुरेशी (३५) रा.रामरहीमनगर यांनी अकीलवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेतील अकीलला रुग्णालयात दाखल केले. मात्र पहाटे ४.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत अकील याचे वडील सलीम शहा व मोठा भाऊ शहेजाद शहा हे दोघे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. आठ दिवसापूर्वी सलीम शहा (सागवान) याला पिस्तुल प्रकरणात अटक केली होती. सलीम शहा हा न्यायालयीन कोठडीत होता. मुलाच्या खुनानंतर त्याला न्यायालयाने तीन दिवसाचा तात्पुरता जामीन मंजूर केला.
दोन आरोपींना अटक
गुन्हा घडल्यानंतर आरोपींची नावे माहीत होताच शहर पोलीस ठाण्याच्या शोधपथकाने तपास सुरू केला. यात शेख इम्रान ऊर्फ गोलू शेख महेमूद व शेख सलाम शेख अहमद कुरेशी या दोघांना अटक केली. या घटनेतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Congress corporator boy son's murderous blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून