पुसद, महागावमध्ये काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:13 PM2018-02-03T22:13:04+5:302018-02-03T22:13:16+5:30
केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात पुसद येथे काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात पुसद येथे काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पुसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे अॅड. सचिन नाईक, तालुकाध्यक्ष पुंडलिक टारफे, शहर अध्यक्ष जकी अनवर, माजी नगरसेवक महेश खडसे, अजय पुरोहित, बाबा उंटवाल, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सय्यद इस्तीयाक, के.आय. मिर्झा, आरीफ गुड्डू, जिया शेख, नन्हेखान, शेख चाँद, अमजद बिल्डर, अशोक चव्हाण, साबीर शेख, विठ्ठल दुपारते, तहसीन पहेलवान, रज्जाक खान, समद कुरेशी, शेख जुनेद उपस्थित होते.
महागावात तहसीलसमोर आंदोलन
महागाव : येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी काँग्रेसने महागाईविरूद्ध धरणे आंदोलन केले.
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. या भाववाढीचा निषेध म्हणून शुक्रवारी तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार विजयराव खडसे, सभापती गजानन कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, आरिफ सुरैया, वनमालाताई राठोड, शैलेश कोपरकर, कयाम नवाब, अरुण पाटील, प्रकाश सांगडे, पुंडलिक भुरके, प्रकाश नरवाडे, बंटी पठाण, दलितानंद खडसे, विनोद कोपरकर, इस्माईल सेठ, श्रीकांत लिगदे, मनोज गावंडे, अभिजित कावळे, अक्षय खाडे, शे. जमाल आणि शेतकºयांनी आंदोलनत सहभाग घेतला. आंदोलकांनी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरित भरपाई देण्याचीही मागणी केली.