यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व

By विशाल सोनटक्के | Published: November 6, 2023 06:48 PM2023-11-06T18:48:51+5:302023-11-06T18:51:24+5:30

यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. एकूण १६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. पाच शिंदे शिवसेना ...

Congress dominates Gram Panchayat elections in Yavatmal | यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व

यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व

यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. एकूण १६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. पाच शिंदे शिवसेना गटाने तर तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. आठ ग्रामपंचायतीत संमिश्र निकाल राहिला. यवतमाळ तालुक्यात दोन, दारव्हा दोन, पुसद एक, उमरखेड दोन, मारेगाव पाच, राळेगाव सहा, बाभूळगाव चार, केळापूर चार आणि घाटंजी तालुक्यात सहा ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली.  

राळेगाव तालुक्यात सहा पैकी पाच ठिकाणी कॉंग्रेसने तर एक ग्रामपंचायत भाजपने जिंकली. दारव्हात दोनही ठिकाणी शिंदे गटाचा विजय झाला. दरम्यान वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीतही जिल्हयात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत वर्चस्व राखले होते. आता ग्रामपंचायत ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतही काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

Web Title: Congress dominates Gram Panchayat elections in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.