पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:16 PM2018-10-11T22:16:53+5:302018-10-11T22:17:19+5:30

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत आहेत. यातून सर्वसामान्य नागरिक हैराणझाले आहे. यामुळे जिल्हा युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बसस्थानक चौकात आंदोलन करून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला.

Congress movement against petrol price hike | पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

Next
ठळक मुद्देशासनाचा निषेध : धूळ फेक करून जिंकलेल्या सरकारने जनतेला संकटात लोटले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत आहेत. यातून सर्वसामान्य नागरिक हैराणझाले आहे. यामुळे जिल्हा युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बसस्थानक चौकात आंदोलन करून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला.
सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने सर्वसामान्यांना आर्थिक संकटात ढकलले आहे. दरवाढ मागे घेण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, यवतमाळ शहर काँगे्रसचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, युथ काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्की राऊत, विद्यार्थी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, रोहीत देशमुख, पारस अराठे, कृष्णा पुसनाके, लाला तेलगोटे, नईम पहेलवान, नगरसेवक छोटू पावडे, प्रमोद बगाडे, राजीक पटेल, वैभव जवादे, शैलेष सराफ, राजवर्धन गाडे, अनिल गाडगे, गजानन पायघन, घनशाम अत्रे, ललित जैन, सुवेध भेले, श्याम खडसे, दत्ता हाडके, सुभम लांडगे, नितीन गुघाने, सूरज लोंदे, सनी आगळे, वैभव शेंडे, शंतनु देशमुख, किशोर शिंदे, आदित्य ताटेवार, अमित बिडकर, पौरुष चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मोटर वाहन निरीक्षकांचे काय?
२०१७ मध्ये मोटर वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यातील ८३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. उच्च न्यायालयाने ही निवड प्रक्रिया रद्द केली. नंतर ज्या अटीसाठी ही निवड प्रक्रिया रद्द झाली होती, ती अटच रद्द करण्यात आली. यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न आंदोलकांनी केला.

Web Title: Congress movement against petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.