बाभूळगाव येथे काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:12 PM2017-09-11T22:12:30+5:302017-09-11T22:12:48+5:30
राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात येथील तहसीलसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात येथील तहसीलसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
बाभूळगाव तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या, भूमिहीन शेतकºयांच्या हाताला काम देण्यात यावे, २४ तास वीजपुरवठा देण्यात यावा, बेंबळा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करावी, नोटाबंदीमुळे त्रास सहन कराव्या लागणाºया जनतेला न्याय देण्यात यावा, धरणग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला विनाविलंब देण्यात यावा, पीक विम्याला मुदतवाढ देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये युवक काँग्रेसचे राहुल ठाकरे, बाबासाहेब दरणे, प्रकाशचंद छाजेड, अशोक बोबडे, अरुण राऊत, फारूकभाई, नरेंद्र कोंबे, महेंद्र घुरडे, अतुल राऊत, बाबू दौलतकर, अतुल देशमुख, गणीभाई, डॉ.रमेश महानूर, श्रीकांत कापसे, धनराज छल्लाणी, शोभा पिसे, बंडू ताजने, रमेश लोखंडे, उत्तम पाटील, लक्ष्मणराव आखरे, वि.भा. भोरे, यमूताई रूमाले, किशोर हाडके, चंदू परचाके, कृष्णा ढाले, अमोल कापसे, नन्ना महाराज, वसंत परोपटे, प्रकाश नागतोडे, गजानन पांडे, मनोज पाचघरे, सुरेश कोडापे, सुभाष घोडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.