काँग्रेस-राष्ट्रवादी फिप्टी-फिप्टी

By admin | Published: July 20, 2014 12:08 AM2014-07-20T00:08:55+5:302014-07-20T00:08:55+5:30

जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला.

Congress-Nationalist Fipi-Fipi | काँग्रेस-राष्ट्रवादी फिप्टी-फिप्टी

काँग्रेस-राष्ट्रवादी फिप्टी-फिप्टी

Next

नगराध्यक्ष निवडणूक : चार महिलांना संधी, उपाध्यक्षपदांवर काँग्रेसचे वर्चस्व
यवतमाळ : जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला.
उमरखेड, आर्णी व दारव्हा नगरपरिषदा काँग्रेसच्या तर यवतमाळ, पुसद व घाटंजी नगरपरिषदा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या. दिग्रसमध्ये दोन्ही पदावर परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली. नगराध्यक्षाच्या सात पैकी चार जागांवर महिलांना संधी मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सातपैकी सर्वाधिक पाच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. भाजपाला केवळ एक उपाध्यक्षपद मिळाले.
यवतमाळच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष राय तर उपाध्यक्षपदी भाजपाचे मनीष दुबे बिनविरोध विजयी झाले. उपाध्यक्षपद भाजपाच्या मनीष दुबे यांना देण्यात आले. दारव्हा नगरपरिषदेत अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली. आर्णीमध्ये काँग्रेसचे नगर उपाध्यक्ष आरिज बेग यांना बढती देत नगराध्यक्ष बनविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळसह तीन नगरपरिषदांवर आपले वर्चस्व निर्माण केले. घाटंजीमध्ये राष्ट्रवादीच्या चंद्ररेखा रामटेके बिनविरोध निवडून आल्या. पुसदमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसची युती झाली. तेथे राष्ट्रवादीच्या माधवी गुल्हाने निवडून आल्या. दिग्रसच्या नगराध्यक्षपदी परिवर्तन विकास आघाडीच्या सरिता धुर्वे विजयी झाल्या आहेत.
नगर उपाध्यक्ष पदासाठी सात पैकी पाच जागेवर निवडणूक पार पडली. तर दोन जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. यवतमाळात भाजपाचे मनीष दुबे, दिग्रसमध्ये परिवर्तनचे डॉ. मुश्ताक प्यार मोहंमद बिनविरोध निवडले गेले. पुसदमध्ये काँग्रेसचे डॉ. मोहंमद नदीम, उमरखेडमध्ये काँग्रेसच्या नजमाबी दौलतखान, घाटंजीत काँग्रेसचे परेश कारिया, आर्णीमध्ये काँग्रेसच्या नीता ठाकरे तर दारव्ह्यामध्ये काँग्रेसच्या माधुरी गडपायले उपाध्यक्ष पदी विजयी झाल्या.
यवतमाळ नगरपरिषदेत अध्यक्षपद हातून गेल्यानंतर किमान उपाध्यक्षपद तरी पदरी पडावे म्हणून काँग्रेसने अखेरची धडपड चालविली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. गटनेते पदावरूनच काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी अवघ्या तासाभरात दोन गट नेते बदलविल्याने जिल्हा प्रशासनही संभ्रमात पडले होते. नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या निवडीनंतर यवतमाळ शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. त्यांचे चौकाचौकात स्वागत आणि पेढेतुला करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress-Nationalist Fipi-Fipi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.