खदखदणाºया जनभावनेचा काँग्रेसचा जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:51 PM2017-10-16T23:51:25+5:302017-10-16T23:52:33+5:30

लांबलेली कर्जमाफी, फवारणीत मरणारे शेतकरी, वाढणारी महागाई, जीएसटीची त्रासदायक अमलबजावणी अशा मुद्द्यांवर खदखदणाºया जनभावनेला अखेर सोमवारी काँग्रेसने हात घातला.

Congress picnic of Khadakadana | खदखदणाºया जनभावनेचा काँग्रेसचा जनआक्रोश

खदखदणाºया जनभावनेचा काँग्रेसचा जनआक्रोश

Next
ठळक मुद्देमोहन प्रकाश, अशोकराव चव्हाणांचे नेतृत्व : ऐन सणासुदीतही हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लांबलेली कर्जमाफी, फवारणीत मरणारे शेतकरी, वाढणारी महागाई, जीएसटीची त्रासदायक अमलबजावणी अशा मुद्द्यांवर खदखदणाºया जनभावनेला अखेर सोमवारी काँग्रेसने हात घातला. मोर्चासाठी साद घालताच कार्यकर्त्यांसह नागरिकही धावून आले आणि मोर्चाला जनआक्रोश मोर्चाचे रूप आले. नरेंद्र मोदी किसान विरोधी, भाजपाचा निषेध असो, अशा घोषणांसह अनेक दिवसानंतर वारे पंजा आया पंजा हा नाराही दणक्यात गुंजला.
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. त्यामुळे सरकारविरुद्ध जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातून निघालेला मोर्चा आर्णी मार्ग, जिल्हा परिषद या मार्गाने बसस्थानक चौकात पोहोचला. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा दत्त चौक, नेताजी मार्केट, तहसील चौक, नगरभवन या मार्गाने तिरंगा चौकात पोहोचला.
पारंपरिक डफडे, सनई यांच्या ताला-सुरांनी मोर्चा लक्षवेधी ठरला. तर हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीत सामील झालेल्या दहा-पंधरा बैलगाड्यांनी मोर्चाला शेतकरी प्रश्नांचा ‘टच’ दिला. त्यातच भजनी मंडळाने ग्रामीण माणसाच्या मनातील व्यथा भजनांतून व्यक्त केली. ‘नरेंद्रा नरेंद्र असा कसा रे कोपला..’ सिनेगीताच्या चालीवरील हे भजन मोर्चात लक्षवेधी ठरले. भाजपा सरकारने अर्धवट ठेवलेले किंवा आश्वासन देऊनही पूर्ण न केलेले मुद्दे मोर्चेकºयांच्या हातातील फलक बनले होते. कोरडा दुष्काळ जाहीर करा, कापसाला ७ हजार आणि सोयाबीनला ५ हजार भाव द्या, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या, तुरीचे प्रलंबित चुकारे द्या, छोट्या व्यापाºयांना जीएसटीच्या दर महिन्याच्या नोंदीतून सूट मिळावी, स्वामिनाथन आयोग लागू करा, नोकरभरती सुरू करा, शिष्यवृत्ती देण्याची पद्धत सुलभ करा, यवतमाळ जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नावर त्वरित उपाय करा, घरकुलाचे वाटप सुरू करा, डिझेल, पेट्रोलची दरवाढ, भारनियमन मागे घ्या, रेशन दुकानात पूर्ववत साखरेचे वाटप करा, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वाढवा, कीटकनाशक फवारणीने बळी गेलेल्यांना १० तर जखमींना २ लाखांची मदत करा आदी मागण्यांसाठी मोर्चातून जनआक्रोश करण्यात आला.
तिरंगा चौकात प्रचंड गर्दीत जाहीर सभा झाली. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार विजयराव खडसे आदींची तडाखेबाज भाषणे झाली. तर मोर्चा निघण्यापूर्वी माजी आमदार कीर्ती गांधी यांनीही उपस्थितांना संबोधित केले. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, माजी आमदार विजयाताई धोटे, वामनराव कासावार, नंदिनी पारवेकर, जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या सव्वालाखे, डॉ. मो. नदीम, श्याम उमाळकर, राहुल ठाकरे, उपाध्यक्ष भारत राठोड, अशोक बोबडे, अरुण राऊत आदींसह जिल्हाभरातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान, शिष्यमंडळाने जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले.
काँग्रेसच्या मोर्चातून
मोदी सरकारवर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकºयांची कर्जमाफी ही भिक नव्हे. मात्र राज्य शासन भिक दिल्यासारखीच कर्जमाफीची प्रक्रिया राबवित आहे. सोनिया गांधीच्या काळात कर्जमाफी एका फटक्यात आणि अत्यंत सुलभपणे देण्यात आली. शेतकºयांना सरसकट कर्जमाफीशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी केले.
जिल्हा काँग्रेसतर्फे यवतमाळात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तिरंगा चौकातील सभेत मोहन प्रकाश बोलत होते. मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या काशी बनारस मतदारसंघात दवाखान्यात लोक मरत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या गोरखपूरमध्ये तर दोनशे मुलं दगावली. विदर्भात वाघाच्या हल्ल्यात लोक मरत आहेत. पण सरकार याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. हे शासन नरभक्षी आहे, असा घणाघात मोहन प्रकाश यांनी जाहीर सभेत केला.
काँग्रेसचे तारे जमी पर
काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही, अशी टीका अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र या टीकेला उत्तर देणारे वर्तन जनआक्रोश मोर्चात नेत्यांकडून झाले. बैलबंडीवर बसलेले अशोकराव चव्हाण, माणिकराव ठाकरे, वजाहत मिर्झा खणखणीत नारे लावत होते. शिवाजीराव मोघे तर संपूर्ण मोर्चाच्या पुढे रस्त्यावर चालत कार्यकर्त्यांना सूचना करीत होते. वसंतराव पुरके यांनी मोर्चाच्या मध्यभागातील बैलबंडीवर चढून माईक हाती घेतला आणि सरकारच्या निषेधाच्या नाºयांनी वातावरण दणाणून सोडले. काँग्रेसचे हे तारे जमिनीवर आल्याचे पाहून सामान्य कार्यकर्त्यांनीही उत्साहात नारेबाजी केली.

चाय-गाय करणाºयांना बाय बाय करा - अशोकराव चव्हाण
नांदेडच्या मनपा विजयानंतर यवतमाळातील जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आलेले खासदार अशोक चव्हाण यांच्या भाषणाविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. तिरंगा चौकातील सभेत ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव ते देऊ शकले नाही. नोटाबंदीनंतर सर्वांना रांगेत उभे केले. कर्जमाफीच्या अर्जातही भाजपा सरकार शेतकºयांची जात लिहून घेत आहे. मागासवर्गीय, मुस्लिमांवर हल्ले वाढले आहेत. मराठा, धनगर आरक्षण बाजूला टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस नसून ते फसणवीस आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांत काँग्रेसच सर्वाधिक जागी विजयी झालेली असतानाही भाजपा बनवाबनवी करीत आहे. पण आता वारं बदललं आहे. म्हणूनच नांदेडमध्ये भाजपाचा सुपडासाफ झाला. ते फक्त आश्वासनांचे गाजर दाखवितात. मात्र नांदेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीत हे गाजराचं पीक पूर्णपणे वाहून गेलं. आता गाजराची पुंगी वाजणार नाही. मोदी चाय चाय म्हणतात. योगी गाय गाय करतात. आता जनतेने यांना बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे. मनातला संताप मनात ठेवू नका. आता रस्त्यावर उतरा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. यावेळी ‘अशोकराव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ असे नारे देण्यात आले.
 

Web Title: Congress picnic of Khadakadana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.