अपंगत्वावर मात करीत ‘तो’ घालतो घणाचे घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:36 PM2018-05-13T22:36:05+5:302018-05-13T22:36:05+5:30

धावपळीच्या युगात थोड्याशा अपयशाने खचून जाणारे अनेक असतात. मात्र आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याच्या जिद्दीने ‘तो’ घणावर घाव घालीत संसार चालवित आहे.

By conquering the disability, 'he' puts a lot of wounds | अपंगत्वावर मात करीत ‘तो’ घालतो घणाचे घाव

अपंगत्वावर मात करीत ‘तो’ घालतो घणाचे घाव

googlenewsNext
ठळक मुद्देसंघर्षमय कहाणी : डिजिटल इंडियात मतदानापासून वंचित, दोन्ही मुलांनी शाळेचे तोंडच पाहिले नाही

विठ्ठल कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : धावपळीच्या युगात थोड्याशा अपयशाने खचून जाणारे अनेक असतात. मात्र आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याच्या जिद्दीने ‘तो’ घणावर घाव घालीत संसार चालवित आहे.
रमेश भाऊराव चव्हाण (३७) असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे. शेती अवजारे बनविणे हा त्याचा व्यवसाय. त्याच्या कामात त्याची पत्नी संगीता मदत करते. संगीता भात्याच्या सहाय्याने लोखंड गरम करते, तर रमेश एका हाताने त्या तप्त लोखंडावर घणाचे घाव घालतो. पाहिजे तो आकार देऊन शेती अवजार बनवितो. २० वर्षांपूर्वी रमेशचा डावा हात काम करताना थ्रेशरमध्ये अडकला अन् त्याला अपंगत्व आले. काही दिवस घरी बसावे लागले. परंतु पोटाची भूक स्वस्थ बसू देईना. पत्नीची साथ लाभल्याने त्याने नव्या जोमाने अपंगत्वाचे भांडवल न करता, आहे त्या हाताला बळ देऊन घणाचे घाव घालू लागला. त्याला दहा आणि सात वर्षांची दोन अपत्ये आहे. फिरस्तीचे जीणे वाट्याला आल्याने त्याची मुले कोणत्याच शाळेत गेली नाही. दोघेही शिक्षणापासून वंचित आहे.
मूळचा बोरगाव अंजीचा रहिवासी असलेल्या रमेशला एका ठिकाणी रोजगार मिळेना, म्हणून तो गावोगावी फिरू लागला. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यातील अनेक गावात तो फिरला. काही दिवसांपूर्वी तो शिरोली येथे आला. उघड्यावर संसार थाटून त्याने उपजिवीका सुरू केली. त्याच्या या जिद्दीला सर्व कुटुबांचे सहकार्य लाभत आहे.
ना आधार, ना राशनकार्ड, मन मात्र खंबीर
रोजगाराच्या शोधात गावोगावी भटकंती करणाऱ्या रमेशकडे ना आधारकार्ड आहे, ना रेशनकार्ड. त्याला स्वत:चे गाव नाही. गावच नसल्याने रेशनकार्ड नाही. त्याच्याजवळ कोणतीच कागदपत्रे नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा प्रश्नच नाही. डीजिटल इंडियात त्याने अद्याप मतदानाचा हक्कही बजावला नाही. मेहनतीच्या जोरावर ‘तो’ श्रमाची मोठमोठी कामे करतो. परिस्थितीशी झगडत तो संघर्षमय जीवन जगतो. शरीर जरी अपंग असले, तरी त्याचे मन मात्र अद्यापही खंबीर आहे.

Web Title: By conquering the disability, 'he' puts a lot of wounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.