दारव्हा येथे संविधान बचाओ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 09:55 PM2019-03-12T21:55:27+5:302019-03-12T21:56:12+5:30

संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचशीलनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून काढलेली रॅली तहसील कार्यालयात पोहोचली.

Constitution Bachao Abhiyan at Darwha | दारव्हा येथे संविधान बचाओ अभियान

दारव्हा येथे संविधान बचाओ अभियान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पंचशीलनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून काढलेली रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. तेथे तहसीलदार अरुण शेलार यांना निवेदन देण्यात आले. व्हीव्हीपॅटमधून निघणाऱ्या मतांची मागणीनुसार मोजणी झालीच पाहिजे, सुवर्णांना दिलेले दहा टक्के आरक्षण संविधान विरोधी असल्यामुळे तत्काळ रद्द करावे, शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीत १३ टक्के बिंदुनामावली रद्द करून पूर्वीप्रमाणे २०० टक्के बिंदुनामावली कायम करावी, जातीनिहाय जनगणना करून १०० टक्के आरक्षण लागू करावे, धार्मिक अल्पसंख्यकावर होणारा हिंसाचार बंद करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
शहरातील जवळपास ३८ समाज संघटनांनी बंदला पाठींबा दर्शविला. त्यात भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छत्रपती क्रांती सेना, बहुजन कर्मचारी संघ, माळी महासंघ, वडार संघटना, भारिप-बहुजन महासंघ, भीम आर्मी, डॉ.आंबेडकर पुतळा समिती, सम्राट अशोक बौद्ध विहार समिती, गोरसेना, लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय बंजारा मिशन आदींचा समावेश होता. बंद यशस्वीतेसाठी नरेंद्र वाकोडे, बिमोद मुधाने, कुशल शंभरकर, सिद्धार्थ मेश्राम, अ‍ॅड.कठाणे, प्रा.अशोक नाईक, अनिल मोहिते, अनिल राठोड, अरविंद बोदडे, सिद्धांत बोरकर, मदन गाढे, अंकुश ढोके, सचिन बोदडे, अभिषेक बिहाडे, शब्बीर खॉ, शाम गायकवाड, सदानंद खिल्लारे, यशवंत दहिलेकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Constitution Bachao Abhiyan at Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा