‘भारत का संविधान’ आजपासून चित्रपटगृहात

By admin | Published: April 14, 2017 02:35 AM2017-04-14T02:35:59+5:302017-04-14T02:35:59+5:30

देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय संविधानावर हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली

'Constitution of India' from the theater in theaters today | ‘भारत का संविधान’ आजपासून चित्रपटगृहात

‘भारत का संविधान’ आजपासून चित्रपटगृहात

Next

यवतमाळ : देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय संविधानावर हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून हा चित्रपट प्रदर्शित केला जात असून यवतमाळातही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
या सिनेमाचे डायरेक्टर नरेंद्र शिंदे असून विदर्भाच्या नाट्य चळवळीतील कसलेल्या कलावंतांना घेवून तयार केलेली ही एक अविस्मरणीय निर्मिती होय. भारतीय संविधान कुणी निर्माण केले, ते कसे निर्माण झाले, संविधानाचे विरोधक कोण, संविधान सभेत प्रत्येक कलमांवर कशा चर्चा झाल्या, भारतीय राजकारणातील अनेक मातब्बर विद्वानांनी हे संविधान तयार करताना कसे योगदान दिले, हे या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. हा चित्रपट सर्वांनी बघावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 'Constitution of India' from the theater in theaters today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.