संविधान भारतीय संस्कृतीचा ठेवा

By admin | Published: September 1, 2016 02:37 AM2016-09-01T02:37:44+5:302016-09-01T02:37:44+5:30

भारतीय संस्कृतीच्या सगळ््या विलोभनीय वैशिष्ट्यांचा अंतर्भाव भारतीय संविधानात झालेला असल्यामुळे भारतीय संविधान हे भारताचे भाग्यविधाता होय,

Constitution should be kept in Indian culture | संविधान भारतीय संस्कृतीचा ठेवा

संविधान भारतीय संस्कृतीचा ठेवा

Next

वेदप्रकाश मिश्रा : पुसद येथे व्याख्यान
पुसद : भारतीय संस्कृतीच्या सगळ््या विलोभनीय वैशिष्ट्यांचा अंतर्भाव भारतीय संविधानात झालेला असल्यामुळे भारतीय संविधान हे भारताचे भाग्यविधाता होय, असे प्रतिपादन दत्ता मेघे वैद्यक अभिमत विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले.
देशभक्त शंकरराव सरनाईक यांच्या ५० व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित व्याख्यानमालेत ते ‘भारतीय संस्कृतिच्या व्यापकतेचे आयाम’ या विषयावर बोलत होते. जगामध्ये अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि काळाच्या ओघामध्ये अस्त पावल्या.
भारतीय संस्कृती मात्र अजूनही हजारो वर्षापासून टिकून आहे. याचे कारण ती नित्यनूतन आहे. भारतीय संस्कृती ही सनातन आहे याचा अर्थ ती केवळ प्राचीन आहे असा नाही. सनातन आहे म्हणजे तिचे रुप वाहत्या पाण्यासारखे प्रवाही आहे. म्हणूनच ते निर्मळही आहे. स्वच्छही आहे. भारतीय संस्कृतीने देश, धर्म, पंथ, भाषा यांच्या मर्यादा पार करून ‘वसुदेव कुटुंबकम’ ही संकल्पना जगासमोर मांडली. भुदान यज्ञाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ चा नारा देऊन भारतीय संस्कृतीचा उद्घोष केला. आपल्या ओघवत्या आणि तर्कशुद्ध विवेचनानी डॉ. वेदप्रकाश मिश्र यांनी मंत्रमुग्ध केले.
अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी होते. आरंभी डॉ. वेदप्रकाश मिश्र व डॉ. शेषराव सूर्यवंशी यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. उत्तम रुद्रवार व सदस्या वृंदाताई लोखंडे यांनी केला. संचालन निना भंडारी यांनी केले. देशभक्त शंकरराव सरनाईक स्मृती व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी पुसदकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Constitution should be kept in Indian culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.