मल्लिकार्जुन पुलाचे बांधकाम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:10 PM2018-05-17T22:10:56+5:302018-05-17T22:10:56+5:30
येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या धावंडा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यांनी अरुणावती प्रकल्प विभागाची चौकशीची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या धावंडा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यांनी अरुणावती प्रकल्प विभागाची चौकशीची मागणी केली आहे.
यापूर्वी असलेला पूल अत्यंत अरूंदहोता. या पुलावरुन अनेक अपघात झाले होते. अनेकांचे बळी गेले. त्यामुळे माणुसमाºया पूल म्हणून त्याला संबोधले जात होते. या पुलाला तोडून नव्याने पूल बांधण्याची मागणी महसूल राज्यमंत्री संजय राठोडा यांनी पूर्ण केली. त्यांनी नवीन पुलासाठी तब्बल ९१ लाखांचा निधी खेचून आणला. अरुणावती प्रकल्प विभागाने उत्कृष्ट पूल बांधकामाची जबाबदारी घेत एका वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, अरुणावती प्रकल्प विभागाने ‘कमिशन’च्या लालसेने पुलाचे काम रेंगाळत ठेवले. कुणाचाही वचक नसलेल्या या विभागाने तीन वर्षांनंतर १० सप्टेंबर २०१६ रोजी पुलाच्या लोकार्पणाची तारीख निश्चित केली.
त्यानुसार लोकार्पण पार पडले. मात्र अवघ्या दोन वर्षांतच पुलाचे बांधकाम ठिकठिकाणी ढासळले. अनेक जागी पूल उखडला. लोखंडी गज उघडे पडल्याने हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीचे महामंत्री विवेक बनगीनवार यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींच्या निधीचा गैरवापर
आमदार किंवा खासदार निधीतून विकास कामे मंजूर केली जातात. मात्र या निधीतून उत्कृष्ट दर्जाची कामे केली जात नाही, असा अनुभव आहे. अनेक ठिकाणी दोन-तीन वर्षांतच या निधीतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून येते.त्यावर कुणाचेही नियंत्रण नसते. प्त्यामुळे श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या पुलाची चौकशी करुन कारवाईची मागणी आहे.