वैद्यकीय प्रतिनिधींचा संप व निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 09:48 PM2017-12-13T21:48:44+5:302017-12-13T21:49:30+5:30
महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या राज्य कमिटीने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी बुधवारी संप पुकारून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या राज्य कमिटीने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी बुधवारी संप पुकारून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
औषधी विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचे (वैद्यकीय प्रतिनिधी) सर्वसाधारण कामाच्या तासाच्या अधिसूचनेत सुधारणा करून ती सलग १० ते ६ करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा अधिनियम फॉर्म ‘ए’ प्रमाणे औषधी कंपन्यांनी नियुक्तीपत्र वैद्यकीय प्रतिनिधींना बंधनकारक करावे आणि तसे न केल्यास कडक कायदेशीर कारवाई करावी, किमान वेतन २० हजार रुपये, महागाई भत्ता प्रतिबिंदू रुपये पाच, पाच टक्के घरभाडे भत्ता जाहीर करावा, बोनस, प्रॉविडंट फंड, इएसआयसी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, प्रस्तावित कामगार विरोधी कायदे सुधारणा रद्द करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याशिवाय वैद्यकीय प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांवर यावेळी प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुशील चौधरी, सुरज आहाळे, भालचंद्र माहुरे, सुयश प्रतापवार, रुपेश सिंग, संदीप रक्षित, नरेश बाजोरिया, मनिष कुसुंबीवाल, अनिल मरडकर, संजय मुळे, हेमंत ताजने आदी उपस्थित होते.