बायपासवर लुटला औषधांचा कंटेनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 09:39 PM2019-09-27T21:39:52+5:302019-09-27T21:40:08+5:30

एम.एच.१२-क्यू-डब्ल्यू - ९२५५ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे जात असताना महामार्गावर जांब बायपासवरील बहिरमबाबा टेकडीनजीक अ‍ॅक्सल तुटल्याने बंद पडला. या कंटेनरचा चालक मदत मिळविण्यासाठी लगतच्या गावात गेला असता अज्ञात व्यक्तींनी या कंटेनरचे कुलूप फोडून आतील हजारो रुपये किंमतीची औषधी लंपास केली.

Container of drug loot on bypass | बायपासवर लुटला औषधांचा कंटेनर

बायपासवर लुटला औषधांचा कंटेनर

Next
ठळक मुद्देचालकाची तक्रार : श्वानपथकाला पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील जांब फाट्यानजीक शुक्रवारी सकाळी औषधी घेऊन जाणारा कंटेनर अज्ञात व्यक्तींनी लुटला. दरम्यान पोलिसांनी सायंकाळी श्वानपथकासह घटनास्थळी पोहोचून औषध चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला.
एम.एच.१२-क्यू-डब्ल्यू - ९२५५ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे जात असताना महामार्गावर जांब बायपासवरील बहिरमबाबा टेकडीनजीक अ‍ॅक्सल तुटल्याने बंद पडला. या कंटेनरचा चालक मदत मिळविण्यासाठी लगतच्या गावात गेला असता अज्ञात व्यक्तींनी या कंटेनरचे कुलूप फोडून आतील हजारो रुपये किंमतीची औषधी लंपास केली. चालक तेथे आल्यानंतर या चोरीचा प्रकार उघडकीस आला. चालकाने या घटनेची माहिती आपल्या मालकाला दिली.
मालकाने अवधूतवाडी पोलिसांना सूचित केले. ठाणेदार वागतकर यांनी श्वानपथकालाही घटनास्थळी पाचारण केले. चोरट्यांचा सुगावा मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. चोरटे जवळपासचेच असावे असा संशय पोलिसांना आहे. नंतर पहिल्या कंटेनरमधील उर्वरित औषधी दुसरे कंटेनर आणून पुढे पाठविण्यात आले.

Web Title: Container of drug loot on bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.