यवतमाळ जिल्ह्यात भरधाव कंटेनरची एसटीला धडक; सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 09:18 PM2022-06-21T21:18:58+5:302022-06-21T21:19:23+5:30

Yawatmal News येथील पांढरकवडा मार्गावर पारवा शिवारात भरधाव कंटेनरने एसटी बसला धडक दिली. हा अपघात मंगळवारी रात्री ८ वाजता घडला. यात एसटी चालकासह सहा जण जखमी झाले.

container hits ST in Yavatmal district; Six injured | यवतमाळ जिल्ह्यात भरधाव कंटेनरची एसटीला धडक; सहा जखमी

यवतमाळ जिल्ह्यात भरधाव कंटेनरची एसटीला धडक; सहा जखमी

googlenewsNext

यवतमाळ : येथील पांढरकवडा मार्गावर पारवा शिवारात भरधाव कंटेनरने एसटी बसला धडक दिली. हा अपघात मंगळवारी रात्री ८ वाजता घडला. यात एसटी चालकासह सहा जण जखमी झाले.

अमरावती- पांढरकवडा बस (क्र. एमएच ४० वाय ५२४५) यवतमाळवरून पांढरकवडा येथे जात होती. चंद्रपूरवरून कंटेनर (क्र. एमएच ३४ एव्ही १२३४) यवतमाळकडे येत होता. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो एसटी बसला धडकला. या धडकेमुळे एसटी झाडावर जावून आदळली. यात बस चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: container hits ST in Yavatmal district; Six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात