यवतमाळ जिल्ह्यातील नाईक सुतगिरणीचा कंटेनर सातासमुद्रापार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 02:51 PM2020-11-02T14:51:59+5:302020-11-02T14:52:29+5:30

Yawatmal News cotton पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक गिरणीने भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची चीन व हॉंगकॉंग देशात निर्यात होत आहे.

Container of Naik Sutagirani in Yavatmal district across the sea! | यवतमाळ जिल्ह्यातील नाईक सुतगिरणीचा कंटेनर सातासमुद्रापार!

यवतमाळ जिल्ह्यातील नाईक सुतगिरणीचा कंटेनर सातासमुद्रापार!

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भात एकमेव सहकारी सूतगिरणीची विकासाकडे वाटचाल


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: विदर्भात एकमेव सहकारातील सुरू असलेल्या बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे भविष्य अंधकारमय दिसत असतानाच नव्याने पदारूढ झालेल्या अध्यक्ष व संचालक मंडळाने सूतगिरणीला सुगीचे दिवस आणलेले दिसत आहे. नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे  गिरणीतील सुताची निर्यात सातासमुद्रापार पोचली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सूतगिरणीची चाके ठप्प झाली. मात्र, 'अनलॉक' होताच सुत उत्पादनात गिरणीने भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची चीन व हॉंगकॉंग देशात निर्यात होत आहे. सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर व  माधुरी आसेगावकर यांनी पूजन करून शनिवार ता. ३१ रोजी सुताचे पहिले दोन कंटेनर मुंबई बंदरासाठी रवाना केले.

बाबासाहेब नाईक सूतगिरणीत उपलब्ध असलेल्या टीएफओ या अद्ययावत यंत्रावर तयार करण्यात आलेल्या १६ काऊंटच्या सुतास मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे. एकूण दहा कंटेनरद्वारा २०० टन सुताची मागणी चीन व हॉंगकॉंग या देशातून नोंदविण्यात आली. ज्यादा भाव मिळत असल्याने गिरणीने सुत निर्यातीला प्राधान्य दिले व कोरोना काळातही गिरणीने एक पाऊल पुढे टाकले. संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम.आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे लॉकडाऊन नंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून ८९ टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे.

केवळ सुत निर्मितीवर निर्भर न राहता पूरक उत्पादनांवर सूतगिरणीचा भर राहणार आहे. यासाठी यवतमाळ जिल्हा सूत व कापड गिरणी पुसद येथे नाईक सूतगिरणीच्या युनिट- २ चा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर दोन बैठकी झाल्या असून उच्च तंत्रज्ञानावर आधारित जपान मशीन द्वारे टी-शर्ट, लॅक्रान, हॅन्ड ग्लोज, मास्क निर्मिती करण्यात येईल. याद्वारे चारशे कामगारांना रोजगार मिळेल.
- ययाती नाईक
उपाध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणी


सध्या सूतगिरणीचा विजेचा खर्च जास्त आहे. तो वाचविण्यासाठी २.५ मेगावॅट क्षमतेचा सोलर प्रोजेक्ट प्रस्तावित आहे. तो मंजूर झाल्यास विज खर्चात मोठी बचत होईल. कोविडच्या काळातील कामगिरी पाहून वस्त्रोद्योग आयुक्त तसेच एनसीडीसी दिल्ली या संस्थेने सूतगिरणीला कर्जाच्या पुनर्रचनेत सबसिडी दिली आहे. सुताला विदेशातून मागणी येत आहे. सूतगिरणीच्या सुताला मिळालेली ही पावती आहे.
- राजेश आसेगावकर
अध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणी

Web Title: Container of Naik Sutagirani in Yavatmal district across the sea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस