ठेकेदार-शेतकऱ्यात फ्री-स्टाईल
By admin | Published: January 13, 2016 02:59 AM2016-01-13T02:59:55+5:302016-01-13T02:59:55+5:30
पूल बांधताना शेतकऱ्याच्या शेतातून काढलेल्या वळण रस्त्यावरून ठेकेदार आणि एका शेतकऱ्यात चांगलीच फ्री-स्टाईल झाल्याची घटना येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात झाली.
उमरखेड : पूल बांधताना शेतकऱ्याच्या शेतातून काढलेल्या वळण रस्त्यावरून ठेकेदार आणि एका शेतकऱ्यात चांगलीच फ्री-स्टाईल झाल्याची घटना येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात झाली. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
उमरखेड ते टाकळी या रस्त्यावर पुलाचे बांधकाम काही दिवसांपूर्वी सुरू होते. राजाराम माधव डुकरे रा. रुपाळा यांच्या शेतातून वळण रस्ता करून वाहतूक वळविण्यात आली. पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र वळण रस्ता काढला नाही. याबाबत संबंधित शेतकऱ्याने वरिष्ठांकडे लेखी दिले. परंतु ठेकेदार प्रवीण मनवर शेत दुरुस्त करून द्यायला तयार नव्हता. दरम्यान पुसद येथील ठेकेदार मनवर मंगळवारी महागावच्या बांधकाम उपविभागात आला. त्या ठिकाणी पुन्हा शेतकरी डुकरे यांनी वळण रस्त्याचा विषय काढला त्यावरून दोघात शाब्दीक वाद होऊन हाणामारी सुरू झाली. या प्रकरणी शेतकरी राजाराम डुकरे यांंनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ठेकेदार प्रवीण मानकर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)