यवतमाळमध्ये गाढवाच्या गळ्यात बांधकाम सचिवाच्या नावाचं फलक बांधून कंत्राटदारांची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 01:53 PM2017-10-09T13:53:07+5:302017-10-09T13:55:34+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय बांधकाम कंत्राटदारांनी सोमवारी यवतमाळच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय बांधकाम कंत्राटदारांनी सोमवारी यवतमाळच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. कंत्राटदारांनी बांधकामासाठी लागणारी पोकलँड, जेसीबी, रोलर, मिक्सर यासारखी वाहने सर्कल कार्यालयात आणून उभी केली. यावेळी एसर्इंच्या कक्षाबाहेर घोषणाबाजी करुन निवेदन सादर करण्यात आले.
त्यानंतर एका गाढवाच्या गळ्यात अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंग (भाप्रसे) असे लिहिलेले फलक अडकवून निषेध नोंदवण्यात आला. आशिषकुमार सिंग राज्यभरातील कंत्राटदार व बांधकाम अभियंत्यांनासुद्धा जाहीररित्या चोर म्हणून हिनवतात. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. दिवाळीपर्यंत थकीत देयके न मिळाल्यास अधीक्षक अभियंता कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करुन काळी दिवाळी साजरी केली जाईल, असा इशारा कंत्राटदारांनी यावेळी दिला.