कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By admin | Published: August 27, 2016 12:51 AM2016-08-27T00:51:32+5:302016-08-27T00:51:32+5:30
शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे व आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ...
यवतमाळ : शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे व आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील योजनेत काम करणाऱ्या तरुण अभियंत्याचा कामावरून परतताना अपघाती मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा कामाच्या व्यापामुळे हृदयविकाराने मृत्यू झाला. पण या दोन्ही कर्मचाऱ्यांना केवळ कंत्राटी कर्मचारी असल्याने शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, गटविमा, रजा रोखीकरण, मृत्यू उपदान, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा, नियमित प्रवास भत्ता, प्रसूती रजा व इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा द्याव्या आदी मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात चंदन बहादुरे, संतोष भोयर, अली असगर शेख शफी, अंकुश नारिंगे, मो. माजीद शेख अंसार, सपना तायवाडे, प्रवीण वैद्य, त्रिशरण कोल्हे, राकेश बडगुजर, चंद्रशेखर राऊत, पियूश शेरेकर, राजेश बोढाले, मोरेश्वर कोहळे, सोनाली मारोळकर, सोनल धकाते, विक्की इंगोले, सूरज रेवसेकर, विलास बरडे, पंकज उगले, रवींद्र तायडे, सतीश मेश्राम सहभाग घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)