शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:07 PM2018-02-24T22:07:19+5:302018-02-24T22:07:19+5:30

शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांतही असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी १८ तास काम करण्याची गरज आहे, ...

Control the growing crime in the city | शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करा

शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करा

Next
ठळक मुद्देभावना गवळी : पोलिसांनी १८ तास काम करण्याची गरज

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांतही असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी १८ तास काम करण्याची गरज आहे, असे मत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पोलीस अधीक्षकांपुढे नोंदविले. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुन्हेगारी नियंत्रित न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
यवतमाळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालून शहर दहशतमुक्त करण्यात यावे या मागणीसाठी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात निवदेन देण्यात आले.
यावेळी खासदार गवळी म्हणाल्या, शहरात खून, मटका, गोधन तस्करी, अवैध सावकारी, दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. इतकेच नव्हे तर गुन्हेगार पोलिसांवर हल्ले करीत आहे. यामुळे शहरात पोलिसांचे अस्तित्वच आहे किंवा नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांशी संबंध ठेवून असलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांची यवतमाळ शहराबाहेर बदली करण्यात यावी. खुलेआम सुरू असलेले मटका आणि जुगार अड्डे बंद करण्यात यावे. गोधन तस्करीवर प्रतिबंध घालावा. अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी. यासह अनेक विषय पोलीस अधीक्षकांपुढे मांडण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, संपर्कप्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे, किशोर इंगळे, संजय रंगे, पिंटू बांगर, अनिल यादव, गिरीष व्यास, संतोष गदई, प्रदीप फरकाडे, नंदू घुगे, ऋषी इलमे, गणेश गावंडे, विक्रम बºहाणपुरे उपस्थित होते.
चार्ली जवानांना सक्रिय करा
गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी चार्ली जवानांना सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे. गुन्हा घडल्यानंतर उपाय न करता तत्पूर्वीच उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पोलिसांकडून होणाºया गुंडागर्दीवरही चिंता नोंदविली. शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे यांनी पोलीस अधीक्षकांनी गणवेश बदलून समाजात फिरण्याचे सूचविले. भाईगिरीबद्दल युवकांमध्ये आकर्षण वाढत असल्याची चिंता नोंदविण्यात आली. खासदार भावना गवळी यांनी गुन्हेगारी नियंत्रणात न आल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

Web Title: Control the growing crime in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.