प्ले स्कूल, अंगणवाड्यांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण; नवं धोरण लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 09:46 AM2023-04-28T09:46:06+5:302023-04-28T09:46:27+5:30

अभ्यासक्रम लागू होणार; तयारीला वेग

Control of Play Schools, Anganwadis by Education Department; The new policy will be implemented | प्ले स्कूल, अंगणवाड्यांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण; नवं धोरण लागू होणार

प्ले स्कूल, अंगणवाड्यांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण; नवं धोरण लागू होणार

googlenewsNext

यवतमाळ : प्ले स्कूल, तसेच अंगणवाड्यांच्या अभ्यासक्रमांबाबत सध्या राज्य सरकारचे ठराविक नियम नाहीत. मात्र, आता त्यांच्यासाठी शिक्षण विभागामार्फत लवकरच नवा अभ्यासक्रम निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे प्ले स्कूल व अंगणवाडी चालविणाऱ्या संस्थांवर शिक्षण विभागाचे थेट नियंत्रण राहू शकणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. त्यानुसार सरकार अभ्यासक्रमाचा नवा आराखडा तयार करीत आहे. हा अभ्यासक्रम अमलात आल्यानंतर प्ले स्कूल चालविणाऱ्या संस्थांना सरकारकडे नोंदणी करणे बंधनकारक होणार 
आहे. 

खासगी व सरकारी अंगणवाड्याही या नियमांच्या अखत्यारीत येणार आहेत. शालेय शिक्षण सुरू होण्यापूर्वी मुलांचा पाया मजबूत व्हावा, या उद्देशाने सरकार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवीत आहे. सध्या अंगणवाड्या व प्ले स्कूलमध्ये नेमके काय शिकविले जाते, याबाबत सरकारकडे माहितीच उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम शालेय शिक्षणावर होत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक विकासावरही भर दिला जाणार आहे. शालेय शिक्षणाच्या नव्या अभ्यासक्रमात कृषी क्षेत्रालाही स्थान दिले जाणार आहे.   

Web Title: Control of Play Schools, Anganwadis by Education Department; The new policy will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.