धरणग्रस्तांच्या आंदोलनात वादाची ठिणगी; आजी-माजी आमदारांत बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 12:08 PM2022-05-02T12:08:52+5:302022-05-02T12:09:03+5:30

आमदार बोदकुरवार ठाकरे सरकारला दोषी ठरवत होते, तर माजी आमदार विश्वास नांदेकर फडणवीस सरकारला दोष देत होते. यातून हा वाद वाढला.

controversy erupts in dam victims' movement, political fight between bjp mla and shiv sena district president | धरणग्रस्तांच्या आंदोलनात वादाची ठिणगी; आजी-माजी आमदारांत बाचाबाची

धरणग्रस्तांच्या आंदोलनात वादाची ठिणगी; आजी-माजी आमदारांत बाचाबाची

googlenewsNext
ठळक मुद्देएकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मारेगाव (यवतमाळ) : धरणाच्या प्रश्नावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाजपचे वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यात तालुक्यातील हटवांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे होते. शनिवारी दुपारी माजी आमदार विश्वास नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करत असतानाच तेथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील पोहोचले. दोघेही शेतकऱ्यांशी सवांद साधत होते. याचवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे पाप कोणत्या सरकारचे? या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला.

आमदार बोदकुरवार ठाकरे सरकारला दोषी ठरवत होते, तर माजी आमदार विश्वास नांदेकर फडणवीस सरकारला दोष देत होते. यातून हा वाद वाढला. वाद एवढा विकोपाला गेला की, विश्वास नांदेकर हे थेट आमदार बोदकुरवार यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, तिथे उपस्थित पोलिसांनी या वादात मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. त्यानंतर आंदोलन स्थळावरील तणाव निवळला.

मी आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वी विश्वास नांदेकर शेतकऱ्यांशी बोलत होते. मी ही त्याठिकाणी पोहोचलो. याप्रकरणी काय होऊ शकते, याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना वादाला सुरूवात झाली. नांदेकर हे फडणवीस सरकारला दोषी ठरवत होते. वास्तविक धरणाची मंजुरी काॅंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात आणि शेतकऱ्यांचे सातबारावरून नाव कमी करण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या काळात घडला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१५मध्ये मोबदल्यात वाढ केली होती. यावरून वाद झाला.

- आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी

मी हटवांजरी येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना आमदार बोदकुरवार त्या ठिकाणी आले. मी सन्मानपूर्वक त्यांना बसायला जागा दिली. दोघेही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना बोदकुरवार यांनी या सर्व प्रकरणाला ठाकरे सरकार दोषी आहे, असा आरोप केला. यावरून आमच्यात वाद झाला. राज्यातील ठाकरे सरकारवर अकारण टीका करणे आम्ही सहन करणार नाही.

-विश्वास नांदेकर, माजी आमदार, वणी

Web Title: controversy erupts in dam victims' movement, political fight between bjp mla and shiv sena district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.