पुसद तालुक्यात कोरोनाचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:55+5:302021-04-17T04:40:55+5:30
सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्या ६८१ वर पाेहचली आहे. तालुक्यातील आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण चार हजार ३८९ झाले आहेत. ...
सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्या ६८१ वर पाेहचली आहे. तालुक्यातील आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण चार हजार ३८९ झाले आहेत. आतापर्यंत तीन हजार ६५९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ५५ वर पाेहोचली आहे. त्यामध्ये शहरातील ३२, तर ग्रामीण भागातील २३ नागरिकांचा समावेश आहे. पुसदमध्ये मागील पाच दिवसात पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शनिवारी ६४, रविवारी १३८, सोमवारी १५१, मंगळवारी १७०, बुधवारी ७० अशा ५९३ नागरिकांचा समावेश आहे. तालुक्यात मागील पाच दिवसात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शनिवारी शहरातील एक ३३ वर्षीय पुरुष, रविवारी एक ८५ वर्षीय महिला, तर मंगळवारी शहरातील ५३ वर्षीय पुरुष, तालुक्यातील श्रीरामपूर येथील ७५ वर्षीय पुरुष व सत्तरमाळ येथील ६० वर्षीय उपसरपंच आदी पाच जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबळींची संख्या ५५ वर पोहोचली आहे.
नागरिकांनी तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन एसडीओ डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार अशोक गीते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे आदींनी केले आहे.