कोरोनाचा शैक्षणिक वर्षाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:57+5:302021-06-28T04:27:57+5:30
कोरोनामुळे पालक व विद्यार्थी चिंतेत आहेत. कोरोनामुळे धार्मिक उत्सवावरही बंदी आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक क्षेत्राला फिजिकल ...
कोरोनामुळे पालक व विद्यार्थी चिंतेत आहेत. कोरोनामुळे धार्मिक उत्सवावरही बंदी आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक क्षेत्राला फिजिकल डिस्टन्स ठेवण्यासाठी म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. परिणामी यावर्षी शैक्षणिक क्षेत्राला सर्वांत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सर्व शाळा महाविद्यालयांसह, उच्च शिक्षण क्षेत्राचे उपक्रम कधी सुरू होतील, असा प्रश्न आहे.
कोरोनामुळे मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, महाविद्यालये, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय शिक्षण देणे कठीण झाले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने परत चिंता वाढली आहे. शाळा व महाविद्यालये सुरू झाली तर फिजिकल डिस्टन्स कसे पाळायचे, हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. २०२०-२०२१ हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात तशी तयारी सुरू आहे. मात्र, खासगी तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, वाडी, तांड्यावरच्या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसे शिक्षण द्यायचे, हा प्रश्न भेडसावत आहे.
बॉक्स
ऑगस्ट अखेरपर्यंत धाकधूक कायमच
शिक्षणमंत्र्यांनी ई-लर्निंग व मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण द्यावे, असे सांगितले. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे १५ ऑगस्ट २०२० पर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सांगितले आहे. यातून कोरोनामुळे सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी हे शैक्षणिक वर्ष वाया जाईल का, याबाबत विद्यार्थी व पालक वर्गात चिंता व्यक्त होत आहे.