कोरोनाने केला दारव्हा, वणीच्या दोघांचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:00 AM2020-12-19T05:00:00+5:302020-12-19T05:00:07+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ३९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जण नव्याने पॉझिटिव्ह तर ३४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ३२ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ४६३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३८७ जणांच्या मृत्युची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच असून शुक्रवारी आणखी दोन रुग्णांचा प्राणघात झाला. मृतकांमध्ये वणी येथील ६३ वर्षीय पुरुष आणि दारव्हा येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्याचवेळी दिवसभरात ४७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. तर ३२ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ३९५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जण नव्याने पॉझिटिव्ह तर ३४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ३२ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ४६३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३८७ जणांच्या मृत्युची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
सुरूवातीपासून आतापर्यंत १ लाख १८ हजार ९३९ नमुने पाठविले असून यापैकी १ लाख १८ हजार २२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ लाख ६ हजार ६५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले. तर ७१२ अहवालांची अद्याप प्रतीक्षा असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे.
आता जपून वागा
प्रशासनाने सार्वजनिक जीवनात वावरण्याचे नियम शिथील केल्याने सर्वत्र गर्दी होत आहे. त्यामुळेच आता नागरिकांनी अधिक जपून वागण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे.