यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने ४८ तासात आठ मृत्यू, २०२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:25 PM2020-09-02T22:25:17+5:302020-09-02T22:25:39+5:30
यवतमाळ जिल्ह्यात १ व २ सप्टेंबर या दोन दिवसात कोरोना संसर्गाने तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चौघे एकट्या यवतमाळ शहरातील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात १ व २ सप्टेंबर या दोन दिवसात कोरोना संसर्गाने तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चौघे एकट्या यवतमाळ शहरातील आहे.
आठ मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. नेर येथील दोन सख्ये भाऊही कोरोनाचे बळी ठरले. ४८ तासात २०२ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यात १३५ पुरुष व ६७ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक ६६ रुग्ण यवतमाळ शहरातील आहे. त्या खालोखाल महागाव ३३, पांढरकवडा २७, दिग्रस २१ व पुसदच्या १९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७ झाली आहे. २०२ जणांना कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२६ असून आतापर्यंतचे एकूण रुग्ण ३६०१ आहे. त्यातील २६६७ कोरोनामुक्त झाले.