कोरोनाचा मृत्यूदर सरासरीहून जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:31+5:30

कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे. हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा, असे ना. पटोले यांनी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारायच्या असेल तर शासनाच्या निधीची वाट न बघता कंपन्यांचा सीएसआर फंड उपयोगात आणा.

Corona mortality is above average | कोरोनाचा मृत्यूदर सरासरीहून जास्त

कोरोनाचा मृत्यूदर सरासरीहून जास्त

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष : नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचे प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून पहिल्या अडीच महिन्यात एकही मृत्यू न झालेल्या यवतमाळचा मृत्युदर आज ३.१ टक्के आहे, याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी खंत व्यक्त केली. कोरोनचा मृत्यूदर हा सरासरी २.८ टक्के आहे. त्यापेक्षा मृत्युदर जास्त असणे हे आपले अपयश आहे. हा दर कमी करण्यासाठी लोकांच्या मनातून कोरानाबाबतची भीती घालविण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश ना. पटोले यांनी रविवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.
कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे. हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा, असे ना. पटोले यांनी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारायच्या असेल तर शासनाच्या निधीची वाट न बघता कंपन्यांचा सीएसआर फंड उपयोगात आणा. खनीजमधून असा फंड उभारण्यास यवतमाळ जिल्ह्यात अडचण यायला नको, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोरोना रूग्णालयाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कोविडचा आढावा घेतला. सादरीकरण जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले. बैठकीला माजी आमदार कीर्ती गांधी, वामनराव कासावार, विजय खडसे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, श्याम पांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. विजय डोंबळे, डॉ. मनवर, किरण कुमरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

नाना पटोले यांचे स्वानुभवाचे बोल
कोरोना ही बिमारी फुफ्फुसाशी निगडीत आहे. फुफ्फुसाला दुसरा पर्याय नाही. तीन ते चार दिवस ही बिमारी अंगावर काढली तर आपले काहीही होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमधून मी गेलो आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच आपली चाचणी करून घ्यावी. जिल्ह्यात चाचण्या करण्याची प्रक्रिया वाढवा. ऑक्सीजनवरचा रुग्ण आपल्या हातात आहे. व्हेंटीलेटरवर त्याला जाऊ देऊ नका. तसेच रुग्णालयाची गर्दी कमी करायची असेल तर रुग्ण घरीच बरा झाला पाहिजे, याबाबत प्रशासनाने निश्चित धोरण आखावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

Web Title: Corona mortality is above average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.