मारेगावातील कोविड केंद्रावरून कोरोना रूग्ण पळाला; तालुका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 09:33 AM2020-07-29T09:33:27+5:302020-07-29T09:33:43+5:30
बुधवारी पहाटे कुंभा येथील पाॅझिटिव्ह असलेला रूग्ण कोविड केंद्रातून गायब झाला.
यवतमाळ: मारेगाव येथील कोविड केंद्रातून कोरोनामारेगावातील कोविड केंद्रावरून कोरोना रूग्ण पळाला; तालुका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड पाॅझिटिव्ह रूग्ण पळून गेल्याने प्रशासन हादरून गेले आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने तालुका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येताच, प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात असतानाच व्यवस्थेतील भोंगळ कारभार समोर येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील कोविड केन्द्रात ३६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात एक कोरोना पाझिटीव्ह रुग्णही दाखल आहे.
बुधवारी पहाटे कुंभा येथील पाॅझिटिव्ह असलेला रूग्ण कोविड केंद्रातून गायब झाला. ही बाब सकाळी उघडकिस आली आणि एकच खळबळ उडाली. रुग्नाचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. पोलिस बंदोबस्त असताना कोरोना रूग्ण पळाल्याने आचर्य व्यक्त करण्यात येत आहे.