Corona Virus in Yawatmal; मुंबईतून यवतमाळकडे निघालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा वाटेतच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 08:00 PM2020-05-30T20:00:40+5:302020-05-30T20:02:58+5:30

केवळ संशयावरून शेकडो व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण खासगी अ‍ॅम्बुलन्सने मुंबईहून यवतमाळकडे निघाला. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यवतमाळात त्याला मृतावस्थेत आणण्यात आले.

Corona positive patient dies on the way from Mumbai to Yavatmal | Corona Virus in Yawatmal; मुंबईतून यवतमाळकडे निघालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा वाटेतच मृत्यू

Corona Virus in Yawatmal; मुंबईतून यवतमाळकडे निघालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा वाटेतच मृत्यू

Next
ठळक मुद्दे दिग्रस तालुक्यातील रहिवासीमृतावस्थेत आणले गुन्हा नोंदविण्याच्या प्रशासनाच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केवळ संशयावरून शेकडो व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण खासगी अ‍ॅम्बुलन्सने मुंबईहून यवतमाळकडे निघाला. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यवतमाळात त्याला मृतावस्थेत आणण्यात आले. जिल्हा प्रशासन आता हा पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईबाहेर पडला कसा, याचा शोध घेत आहे.
४२ वर्षे वयाचा सदर व्यक्ती जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील आरंभी गावचा रहिवासी आहे. मुंबईत तो वास्तव्याला होता. प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईतील घाटकोपरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्याने त्या डॉक्टरांनी त्याला कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेण्यास सांगितले. दरम्यान, या रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या आरंभी येथील राजकीय पदाधिकारी राहिलेल्या नातेवाईकांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी या रुग्णाला घेवून थेट यवतमाळला येण्यास सांगितले. त्यानुसार मुंबईवरून एम.एच.०६/जे-८८२८ क्रमांकाच्या खासगी अ‍ॅम्बुलन्सने या रुग्णाला घेवून त्याचा भाऊ व सोबत तीन चालक यवतमाळकडे निघाले. मात्र वाटेतच प्रकृती आणखी बिघडल्याने या रुग्णाचा मृत्यू झाला. सायंकाळी ही अ‍ॅम्बुलन्स यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात पोहोचली. नातेवाईकांच्या बोलण्यात तफावत आढळल्याने उपस्थितांना संशय आला. त्यामुळे डॉक्टरांनी पीपीई किट घालून अ‍ॅम्बुलन्समध्येच या रुग्णाची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे निष्पन्न झाले. आता या मृतासोबत आलेल्या चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईहून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण यवतमाळात मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने त्याच्या मुंबई ते यवतमाळ प्रवासाची चौकशी सुरू केली. बाहेरगाववरून आलेल्या प्रत्येकाला कोरोना संसर्गाच्या संशयावरून क्वारंटाईन केले जाते. येथे मात्र चक्क पॉझिटिव्ह रुग्णच प्रवासाला निघाला कसा, याची चौकशी मुंबईच्या संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून केली जात आहे. याप्रकरणी या रुग्णाला घेवून यवतमाळकडे येणाऱ्या मृताचे नातेवाईक व इतरांवर गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता आहे. या मृताची नोंद आता मुंबईत होईल की यवतमाळात हे मात्र स्पष्ट नाही.

मुंबईच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून हा रुग्ण यवतमाळकडे प्रवासाला निघाला कसा, याची चौकशी केली जात आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर गुन्हे नोंदविले जाईल. मात्र या मृताची नोंद यवतमाळच्या यादीत होणार नाही.
- एम.डी. सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Corona positive patient dies on the way from Mumbai to Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.