घाटंजीतील व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:41 AM2021-03-18T04:41:58+5:302021-03-18T04:41:58+5:30

शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, पानठेला चालक, कंत्राटदार, हेअर सलून व ब्युटी पार्लर चालक, ऑटोरिक्षा चालक, फळ व भाजी ...

Corona testing is mandatory for professionals in Ghatanji | घाटंजीतील व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

घाटंजीतील व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

Next

शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, पानठेला चालक, कंत्राटदार, हेअर सलून व ब्युटी पार्लर चालक, ऑटोरिक्षा चालक, फळ व भाजी विक्रेते या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व व्यावसायिकांना चाचणी करणे बंधनकारक आहे. ही चाचणी निशुल्क असून दररोज तहसील कार्यालयाच्या सभागृहात चाचणी सुरू आहे.

चाचणीसाठी आधार कार्डची आवश्यकता आहे. व्यावसायिकांनी चाचणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र, आपल्या दुकानात, आस्थापनेत ठेवणेही बंधनकारक आहे. जे व्यावसायिक व विक्रेते चाचणी करणार नाही, त्यांचे विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच दुकान, आस्थापना सुरु करण्यास मज्जाव केला जाईल. चाचणीसाठी मदत लागल्यास आरोग्य विभाग, तहसील कार्यालय, नगरपरिषद येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार पूजा माटोडे, मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केले. सामान्य नागरिकांना सुद्धा चाचणी करुन देण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Corona testing is mandatory for professionals in Ghatanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.