पुसद तालुक्यात कोरोना विषाणूचा कहर सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:00 AM2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:30+5:30
तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१० झाला असून ९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या ३०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शनिवारी आणि रविवारी अशा दोन दिवसात २१ रुग्ण वाढले. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१० झाला असून ९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या ३०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला.
गुरुवारी रात्रीपर्यंत १७, शुक्रवारी ६ रुग्ण आढळून आले होते. तर शनिवारी रॅपिड अॅन्टीजन टेस्टमध्ये शेलू येथील एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आढळले. यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. तर रविवारी आणखी १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील तीन जण रॅपिड टेस्टमध्ये तर १४ जणांचा अहवाल आरटीपीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचाही आकडा वाढत आहे. आतापर्यंत ३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली. शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ग्रामीण भागातही विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.
कोरोनाला सहज घेऊ नका, प्रशासनाचे आवाहन
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाला सहज घेऊन बिनधास्तपणे वावरु नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, प्रभारी बीडीओ शिवाजी गवई, टीएचओ डॉ. आशिष पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे, सीओ डॉ. किरण सुकलवाड यांनी केले.