कोरोना व्हायरस ३० अंश तापमानात नष्ट होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:44 PM2020-03-05T20:44:06+5:302020-03-05T20:46:26+5:30

कोरोना व्हायरस २८ डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. विदर्भात सध्याचेच तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तरी या व्हायरसचा विदर्भाला धोका नाही.

The corona virus destroy at 30 degrees Celsius | कोरोना व्हायरस ३० अंश तापमानात नष्ट होतो

कोरोना व्हायरस ३० अंश तापमानात नष्ट होतो

Next
ठळक मुद्देआरोग्य सचिवांची माहितीविदर्भात धोका कमीच, गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचना

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जगाला सळो की पळो करून सोडणारा कोरोना व्हायरस २८ ते ३० डिग्री तापमानातच जिवंत राहू शकत नाही, उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे फार घाबरण्याचे कारण नाही. केवळ पावसाळा व हिवाळ्यात दक्षता घ्यावी लागेल. सध्या गर्दीची ठिकाणे टाळावी लागेल. ही माहिती खुद्द राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. या कॉन्फरन्सिंगमध्ये मुंबईहून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास तर यवतमाळात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण प्रामुख्याने सहभागी झाले होते.
सचिव डॉ. मुखर्जी यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना सांगितले की, कोरोना व्हायरस २८ डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. विदर्भात सध्याचेच तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तरी या व्हायरसचा विदर्भाला धोका नाही. यावेळी त्यांनी प्रशासनाने व नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याच्या टिप्सही दिल्या. त्यानुसार नागरिकांनी थंड व कोंदट ठिकाणी गर्दी करणे टाळावे. शिंकताना, खोकताना रूमाल अथवा टिश्यूपेपर वापरण्याची दक्षता घ्यावी. सर्दी, खोकला असणाºया व्यक्तीपासून तीन फूट अंतर राखावे. नियमित सर्दी-खोकला राहात असल्यास तपासणी करून घ्यावी. केवळ बाहेर देशातून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, त्यांची आरोग्य तपासणी करावी, कायम त्यांच्यावर फोकस ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या.

Web Title: The corona virus destroy at 30 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.