कोरोनाचा कहर कायम, आणखी चौघांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:12+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एकंदर ६०६ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६४ पॉझिटीव्ह तर ५४२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२० अक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या १५२ कोरोना बाधितांचा समावेश आहे.

Corona's havoc persists, with four more victims | कोरोनाचा कहर कायम, आणखी चौघांचे बळी

कोरोनाचा कहर कायम, आणखी चौघांचे बळी

Next
ठळक मुद्दे६४ नवे रुग्ण : यवतमाळच्या दोघांसह दिग्रसमधील महिलेचा मृतांमध्ये समावेश, एकूण रुग्णसंख्या दहा हजारांजवळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मध्यंतरी थंडावलेला कोरोनाचा कहर पुन्हा एकदा जीवघेणा ठरत आहे. गुरुवारी जिल्ह्यात कोरोना विषाणूने आणखी चार जणांचे बळी घेतले. तर ६४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
गुरुवारी दगावलेल्या चौघांपैकी यवतमाळ शहरातील ६५ आणि ५० वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ७० वर्षीय महिला आणि अन्य एका ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एकंदर ६०६ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६४ पॉझिटीव्ह तर ५४२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२० अक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या १५२ कोरोना बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत तब्बल ३१८ नागरिकांचा कोरोनाने बळी गेला. तर नऊ हजार ७५६ कोरोना संक्रमितांची नोंद करण्यात आली. त्यापैकी आठ हजार ६७९ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. वैद्यकीय प्रशासनाने आजपर्यंत ८७ हजार ३२२ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यातील ८६ हजार ६८१ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी ७६ हजार ९२५ नागरिकांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले. तर ६४१ अहवालांची अद्याप प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले.
सध्या सण-उत्सवाच्या काळात बाजारात चहलपहल वाढली आहे. प्रशासनानेही दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र बाहेर फिरताना नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

४३ जणांनी केली कोरोनावर मात
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वार्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या तब्बल ४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या ४३ रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता आठ हजार ६७९ झाली आहे.

Web Title: Corona's havoc persists, with four more victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.