यवतमाळ जिल्ह्यातील परंपरागत रक्तरंजित होळीवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 11:18 AM2021-03-28T11:18:18+5:302021-03-28T11:18:39+5:30
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील बोरी गदाजी एक असे गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते. पण आता या रक्तरंजित होळीवर कोरोना वायरसचे सावट आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : होळीची धुळवड म्हतलं की विविध रंग छटा आणि असंख्य रंगानी न्हाऊन निघालेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील बोरी गदाजी एक असे गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते. पण आता या रक्तरंजित होळीवर कोरोना वायरसचे सावट आले आहे. यावर्षी या होळीची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे.
बोरी गदाजी हे गाव रक्तरंजित होळीकरिता दरवर्षी चर्चित असते. गदाजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या या गावांमध्ये मागील पन्नास वर्षांपासून ही परंपरा अविरत चालू आहे. होळीच्या दिवशी या गावी तुफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून पाळला जातो. दर वर्षी फाल्गुन मास पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी या गावी गदाजी महाराज यांची भव्य यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात. ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते.पण ही परंपरा या वर्षी कोरोनामुळे तुटणार आहे .
प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र चालू आहे.