जिल्हा परिषद बदल्यांवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 AM2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:20+5:30
प्रशासनाने १५ टक्केच्या मर्यादेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यात विविध विभागांच्या ज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाची परिस्थिती पाहाता या काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणे धोक्याचे आहे. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातील हजारो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जमण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. मात्र या प्रक्रियेसाठी कोरोना काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.
प्रशासनाने १५ टक्केच्या मर्यादेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यात विविध विभागांच्या ज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाची परिस्थिती पाहाता या काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणे धोक्याचे आहे. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातील हजारो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना बोलावण्यापेक्षा अमरावती जिल्हा परिषदेने जसा या प्रक्रियेसाठी झूम अॅपचा वापर केला, तसाच यवतमाळातही वापर करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने याबाबत अध्यक्ष आणि सीईओंना निवेदन दिले. यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गावंडे, कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, सरचिटणीस दिलीप कुडमेथे, संतोष मिश्रा, भानूदास चिरडे, ताराचंद देवधरे, अनिल कानतोडे, अतुल येलके, शिल्पा मेश्राम, अनु नैताम, कमल तोडसाम आदी उपस्थित होते.
नांदेडमध्ये स्थगिती
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता नांदेड जिल्हा परिषदेने गट क आणि ड संवर्गाच्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया स्थगित केली आहे. यवतमाळमध्ये प्रक्रिया स्थगित करू नये, मात्र गर्दी टाळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.