Coronavirus: यवतमाळमध्ये आणखी १६ रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४१
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:24 PM2020-04-25T16:24:40+5:302020-04-25T16:24:49+5:30
कोरोना रुग्णाच्या तपासणीचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये १६ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. याला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला
यवतमाळ - गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. पुढील तीन दिवस काहीच मिळणार नसल्याने शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुंबळ गर्दी झाली. दुपारचे १२ वाजताही असूनही किराणा दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पोलिसांच्या भीतीने अखेर दुकानदारांनी शटर डाऊन केल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र, आणखी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे.
कोरोना रुग्णाच्या तपासणीचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये १६ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. याला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला असून याबाबत सविस्तर माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आता शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाची संख्या ३१ झाली आहे. एकाचवेळी १६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. जिल्ह्याची आतापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या ४१ झाली आहे.