CoronaVirus News : यवतमाळमध्ये कोरोनाचे 654 नवे रुग्ण, तर पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:53 PM2021-04-01T17:53:08+5:302021-04-01T17:55:13+5:30

CoronaVirus in Yavatmal : गेल्या 24 तासांत 288 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25721 आहे.

CoronaVirus News: 654 new corona patients in Yavatmal | CoronaVirus News : यवतमाळमध्ये कोरोनाचे 654 नवे रुग्ण, तर पाच जणांचा मृत्यू

CoronaVirus News : यवतमाळमध्ये कोरोनाचे 654 नवे रुग्ण, तर पाच जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, लिंक नसल्याने अनेक केंद्रांवर उशिरापर्यंत लसीकरण सुरूच झाले नाही.

यवतमाळ : गेल्या 24 तासांत जिल्ह्यात पाच मृत्युसह 654 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 288 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (CoronaVirus News: 654 new corona patients in Yavatmal)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष आणि 60, 70 व 81 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि. 1) पॉझिटिव्ह आलेल्या 654 जणांमध्ये 431 पुरुष आणि 223 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 237 जण पॉझिटिव्ह, उमरखेड 81, दिग्रस 53, पुसद 52, आर्णी 40, कळंब 36, पांढरकवडा 35, दारव्हा 34, घाटंजी 19, वणी 19, महागाव 10, नेर 10, बाभुळगाव 8, झरीजामणी 8, मारेगाव 6, राळेगाव 3 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहेत.

गुरुवारी एकूण 5998 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 654 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 5344 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2850 ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 1241 तर गृह विलगीकरणात 1609 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29231 झाली आहे. गेल्या 24 तासांत 288 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25721 आहे. तर जिल्ह्यात एकूण 660 मृत्युची नोंद आहे.

दरम्यान, सुरुवातीपासून आतापर्यंत 273032 नमुने पाठविले असून यापैकी 268042 प्राप्त तर 4990 अप्राप्त आहेत. तसेच 238811 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोव्हिड लसीकरणाला लिंकचा खोडा
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, लिंक नसल्याने अनेक केंद्रांवर उशिरापर्यंत लसीकरण सुरूच झाले नाही. यवतमाळ शहरातीलच ही स्थिती असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलही केंद्रांवर अनेकांना लस न देताच परतावे लागले.

Web Title: CoronaVirus News: 654 new corona patients in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.