CoronaVirus News: अखेर ‘त्या’ बनावट गोळ्यांच्या वापरावर बंदी; खरेदी, विक्री, वितरण थांबविण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 08:55 AM2021-06-05T08:55:50+5:302021-06-05T08:56:21+5:30

हिमाचल प्रदेशातील कंपनी दर्शवून स्टार्च पावडरचे घटक असलेल्या गोळ्यांची निर्मिती करीत त्याचा वापर कोविड उपचारासाठी केला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

CoronaVirus News: Ban on 'those' fake pills finally | CoronaVirus News: अखेर ‘त्या’ बनावट गोळ्यांच्या वापरावर बंदी; खरेदी, विक्री, वितरण थांबविण्याचे आदेश

CoronaVirus News: अखेर ‘त्या’ बनावट गोळ्यांच्या वापरावर बंदी; खरेदी, विक्री, वितरण थांबविण्याचे आदेश

googlenewsNext

उस्मानाबाद : कोविडसाठी वापरात आणलेल्या बनावट गोळ्याप्रकरणी अखेर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी निर्बंध घातले आहेत. मुंबईसह राज्यभर वापरात आलेल्या व विक्रीसाठी गेलेल्या गोळ्यांची विक्री त्वरित थांबवावी, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दा.रा. गहाणे यांनी काढले आहेत.

हिमाचल प्रदेशातील कंपनी दर्शवून स्टार्च पावडरचे घटक असलेल्या गोळ्यांची निर्मिती करीत त्याचा वापर कोविड उपचारासाठी केला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. गुप्तचर विभाग व औषध प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई ही करीत फॅविमॅक्स, फॅविपिरॅविर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेट या  गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात स्टार्च पावडर आढळून आल्याने त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीही नमूद पत्त्यावर अस्तित्वात नसल्याचे समोर आले. 

Web Title: CoronaVirus News: Ban on 'those' fake pills finally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.