CoronaVirus News: जिवंतपणीच कोरोनाने मृत झाल्याचे घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 03:00 AM2021-04-04T03:00:14+5:302021-04-04T03:00:35+5:30

यवतमाळ कोविड सेंटरमधील प्रकार; नातेवाईकांना मनस्ताप

CoronaVirus News: Corona declared dead while still alive | CoronaVirus News: जिवंतपणीच कोरोनाने मृत झाल्याचे घोषित

CoronaVirus News: जिवंतपणीच कोरोनाने मृत झाल्याचे घोषित

Next

निवघा बाजार (जि. नांदेड) : हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव (ध.) येथील तरुण यवतमाळ येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना मरण पावल्याची माहिती हदगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. ही माहिती पोलिसांनी बोरगाव येथील तरुणाच्या नातेवाइकांना दिली. मात्र, सदर तरुण जिवंत असल्याने त्याच्या नातेवाइकांना विनाकारण मनस्ताप झाला. बोरगाव (ध.) येथील सुरेश रामदास बोंडारे  हा तरुण पोटगी न भरल्याने यवतमाळ येथील कारागृहात १५ दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याला कोरोना झाल्याने यवतमाळ कोविड सेंटरमध्ये तो उपचार घेत होता. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांनी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाला सुरेश बोंडारे हा कोरोनाने मरण पावला असून, ही माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात यावी, असे कळविले. त्यानुसार नांदेड कंट्रोल रूमवरून ही माहिती हदगाव ठाण्यात देण्यात आली. तशी नोंद स्टेशन डायरीलाही करण्यात आली.

तरुण मयत झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. सुरेश यांचे नातेवाईक यवतमाळ येथे गेले असता तो जिवंत असल्याचे पाहून नातेवाइकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सदर तरुण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, तो ठणठणीत असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळे आम्हाला खूप मानसिक त्रास झाल्याचे विनायकराव कदम यांनी सांगितले. 

Web Title: CoronaVirus News: Corona declared dead while still alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.