coronavirus : प्रवाशांची जनावरांप्रमाणे कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:01 PM2020-03-26T14:01:48+5:302020-03-26T14:02:28+5:30

वाहन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झाला.

coronavirus: Travelers flock to containers like animals | coronavirus : प्रवाशांची जनावरांप्रमाणे कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक

coronavirus : प्रवाशांची जनावरांप्रमाणे कंटेनरमध्ये कोंबून वाहतूक

Next

यवतमाळ  - नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर तेलंगाणा व महाराष्ट्र या दोन राज्याची सीमा लागली आहे. पिंपळखुटी चेकपोस्ट (ता.पांढरकवडा) येथे वाहन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड झाला. अगदी जनावराप्रमाणे ३०० जणांना कंटेनरमध्ये कोंबून तेलंगाणातून महाराष्ट्रात आणले जात होते. पोलिसांच्या सतर्कतेने ही बाब उघडकीस आली. 

तेलंगाणावरून निघालेला कंटेनर (एच.आर.७३/ए-६९८३) पिंपळखुटी चेकपोस्टवर पोलिसांनी तपासणीसाठी थांबविला. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. संशय आल्याने चेकपोस्टवरच्या पोलिसांनी कंटेनरचे कुलूप उघडायला लावले. आतले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. जवळपास ३०० जण या कंटेनरमध्ये अक्षरश: कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. पूर्वी जनावर तस्करीसाठी या पद्धतीचा वापर केला जात होता.

नागपूरवरून जनावरे कत्तलीसाठी हैदराबादला अशाप्रकारे नेण्यात येत होती. हाच अनुभव गाठिशी असल्याने तेलंगाणा सीमा सील केल्यानंतर छुप्या पद्धतीने येथील व्यक्तींना महाराष्ट्रात आणले जाईल हे गृहित धरून पोलिसांनी पडताळणी केली. त्यानंतर जवळपास ३०० जण अवैधरित्या जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे उघड झाले. वृत्त लिहिपर्यंत या अमानवीय प्रकाराबाबत पांढरकवडा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. कंटेनेरमधून आलेल्या नागरिकांना चेकपोस्टवरूनच तेलंगाणात परत पाठविण्यात आले.

Web Title: coronavirus: Travelers flock to containers like animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.