Coronavirus in Yawatmal; यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 07:41 PM2021-05-12T19:41:58+5:302021-05-12T19:43:40+5:30

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मे रोजी 1010 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 11 मे रोजी 1127 तर बुधवार दि. 12 मे रोजी 1231 जण कोरोनामुक्त झाल्याने गत तीन दिवसांत बरे होणा-यांची संख्या 3368 वर पोहचली.

Coronavirus in Yawatmal; Significant increase in the number of corona free patients in Yavatmal district | Coronavirus in Yawatmal; यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ 

Coronavirus in Yawatmal; यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ 

Next
ठळक मुद्दे24 तासात बाधितांपेक्षा बरे होणारे 521 ने जास्त710 पॉझेटिव्ह, 1231 कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क     

यवतमाळ: जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मे रोजी 1010 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 11 मे रोजी 1127 तर बुधवार दि. 12 मे रोजी 1231 जण कोरोनामुक्त झाल्याने गत तीन दिवसांत बरे होणा-यांची संख्या 3368 वर पोहचली. तर गत तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या 2301 आहे. वरील तीनही दिवसांत कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 1067 ने जास्त आहे.  
गत 24 तासात जिल्ह्यात 710 जण पॉझेटिव्ह आले असून 1231 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील पाच मृत्युसह जिल्ह्यात एकूण 27 मृत्युची नोंद झाली. यात दोन नांदेड येथील, दोन वाशिम येथील तर एक मृत्यु चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 8079 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 710 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7369 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6164 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2511 तर गृह विलगीकरणात 3653 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 65138 झाली आहे. 24 तासात 1231 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 57405 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1569 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.02, मृत्युदर 2.41 आहे.

Web Title: Coronavirus in Yawatmal; Significant increase in the number of corona free patients in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.